Aadhar card : निवडणूक ओळखपत्र आधारला लिंक करण्याची अंतिम मुदत वाढली

एमपीसी न्यूज : केंद्राने मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत वाढवली आहे. (Aadhar card) मात्र, दोघांना संलग्न करणे बंधनकारक नाही. वापरकर्ते त्यांचे आधार मतदार कार्डशी ऑनलाइन किंवा एसएमएसद्वारे लिंक करू शकतात. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, आधार-पॅन लिंकिंगमुळे वेगवेगळ्या मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची वेगवेगळी नोंदणी ओळखण्यात मदत होईल.

 

Pune Crime : बनावट दागिन्यांसह महिलांना टार्गेट करणाऱ्या टोळीला अटक

 

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, यामुळे बनावट मतदार ओळखण्यास मदत होईल. आधार क्रमांक न दिल्यास कोणाचेही नाव मतदार यादीतून काढले जाणार नाही, तसेच नावनोंदणी करण्यापासून रोखले जाणार नाही.

 

ऑनलाइन लिंकिंग प्रक्रिया

– सर्वप्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP)- nvsp.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

– मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या “मतदार यादीत शोधा” वर क्लिक करा.

– आधार क्रमांक, राज्य, जिल्हा यासह वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि शोध बटणावर क्लिक करा.

– आधार तपशील प्रविष्ट केल्यानंतर, वापरकर्त्यांच्या मोबाइल नंबर किंवा ईमेलवर एक ओटीपी येईल.

– आता ओटीपी टाका. पूर्ण झाल्यावर तुमचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केले जाईल.

एसएमएस आणि फोनद्वारे कसे लिंक करावे

– 166 किंवा 51969 वर स्पेससह आधार क्रमांकासह मतदार आयडी एसएमएस करा.

– आता आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

– पर्याय विचारेल तशी माहिती देत ​​राहा आणि पुढे जा.

– अशा प्रकारे, तुम्ही एसएमएसद्वारेही आधारशी मतदार ओळखपत्र लिंक करू शकाल.

याशिवाय तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 1950 वर कॉल करून तुमचा आधार मतदार ओळखपत्राशी लिंक करू शकतात

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.