BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडणा-या महिलेला भरधाव वेगात आलेल्या मोपेड दुचाकीने धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 28) रात्री साडेआठच्या सुमारास वाकड येथील काळा खडक झोपडपट्टीसमोर घडला.

सविता सिद्धाराम गायकवाड (वय 35) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लखप्पा तुकाराम गायकवाड (वय 35, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शुभम विजय बाकडे (वय 23, रा. वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास सविता काळाखडक झोपडपट्टीसमोरील सार्वजनिक रस्त्याने पायी जात होत्या. त्या रस्ता ओलांडत असताना दुचाकीवरून भरधाव वेगात आलेल्या शुभमने त्यांना धडक दिली. यामध्ये सविता गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सविता यांचे दीर लखप्पा यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.