BNR-HDR-TOP-Mobile

Pune : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू

0
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – येरवडा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचा-याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.7) सायंकाळी पाच वाजता  आंबेडकर रोड येथे घडली.

सुरेश पदमा थापा (वय 30), असे मयताचे नाव आहे.

थापा हे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता आंबेडकर रोड येथून पायी जात होते. यावेळी एका अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव चालवत सुरेश याला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने सुरेश याचा मृत्यू झाला. तसेच वाहनचालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता अपघाताची खबर न देता पळून गेला.

याप्रकरणी श्रीकांत बरसुडे यांनी फिर्याद दिली त्यानुसार अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.