Akurdi : रेल्वे अपघातात महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात रेल्वेच्या धडकेत एका 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ झाला असून आज (मंगळवारी) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आला.

चिंचवड रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अकराच्या सुमारास लोणावळा-पुणे लोकल चालकांनी एका महिलेचा मृतदेह रेल्वे स्थानकाजवळ दोन रुळांच्या मध्ये पडला असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. महिलेची ओळख पटली नाही. महिलेचे अंदाजे वय 50 वर्ष असून तिची उंची 5 फूट 25 इंच आहे. रंग गोरा, अंगावर नेसनीस गुलाबी रंगाची सलवार व पिवळ्या रंगाचा कुर्ता आहे. हा अपघात नेमका कोणत्या रेल्वेच्या धडकेत झाला याची माहिती अद्याप समजू शकली नाही. संबंधित महिलेविषयी माहिती मिळाल्यास चिंचवड रेल्वे पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'879fad3798c1595b',t:'MTcxNDA2MjIwMC4wNDQwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();