Pune : शतपावली करण्यास गेलेल्या महिलेचा अपघातात दुर्देवी मृत्यू

एमपीसी न्यूज – घरासमोरील रोडवर रात्री जेवणानंतर शतपावली करण्यास गेलेल्या महिलेला एका अज्ञात व्यक्तीने भरघाव वेगात वाहन चालवून दिलेल्या धडकेत दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.11) पावणे दहाच्या दरम्यान धानोरी येथील गोकुलम शाळेजवळ घडली.

मीरा विनोद बिडकर (वय 42, रा. धानोरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी निलेश बिडकर (वय 38, रा. धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यीदी निलेश यांची मोठी वहिनी मीरा या रात्री जेवणानंतर त्यांच्या घरासमोरील रोडवर शतपावली करत होत्या तेव्हा अचानक एका अज्ञात व्यक्तीने भरघाव वेगात वाहन चालवून मीरा यांना धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या व त्यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. आरोपी वाहनचालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता तेथून पसार झाला.
याप्रकरणी पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.