BNR-HDR-TOP-Mobile

Moshi : इमारतीच्या दुस-या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी (दि. 21) सकाळी सातच्या सुमारास मोशी येथे घडली.

मयुर मधुकर वाघ (वय 26, रा. नक्षत्र आयलँड बिल्डींग, मोशी), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मयूर यांचे कुटुंब मोशी येथील नक्षत्र आयलँड बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर  राहत आहे. गुरुवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास मयूर आपल्या घराच्या गॅलरीमध्ये उभा होता. गॅलरीमध्ये उभा असताना अचानक तो खाली पडला. बेशुद्धावस्थेत असताना त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3