Wakad : वाकड येथे सोसायटीच्या बाराव्या मजल्यावरून पडून पिता-पुत्राचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बाराव्या मजल्यावरून  (Wakad) पडल्याने पिता-पुत्राचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 27) सकाळी वाकड परिसरातील ग्रीन पलाश हाऊसिंग सोसायटी येथे घडली.

आदेश क्रांती तावडे (वय 16), क्रांती तावडे (वय 44) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रीन पलाश हाऊसिंग सोसायटी येथे दोघेजण इमारतीवरून पडल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता दोघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.

Pune : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच (Wakad) त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मुलगा आदेश याला बाराव्या मजल्यावरून ढकलून देऊन त्यानंतर क्रांती यांनी उडी मारून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

क्रांती यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. क्रांती आणि आदेश मनोरुग्ण असल्याचे देखील म्हटले जाते. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.