Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू; ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

एमपीसी न्यूज : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाला असून रशियाच्या सत्तेवर पुतीन यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती बसली असल्याचा दावा ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेकडून करण्यात आला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सूरुच आहे. या युद्धादरम्यान पुतीन यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा सुरु आहे. परंतु पुतीन यांचा एका गंभीर आजाराच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला असू शकतो, असा दावा  ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा एमआय 6 (MI6) च्या प्रमुखांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

रशियाने युक्रेनसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांच्या मृत्यूची बातमी लपवण्यासाठी या काळात पुतीन यांच्या बहुरुप्याचा वापर केला जात असल्याचाही आरोप होतोय. याबाबत ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळाने ‘द डेली स्टार’च्या हवाल्याने वृत्त दिलं आहे. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी यापूर्वीसुद्धा पुतीन यांच्याविषयी अनेक दावे केले आहेत. परंतु यावेळी केलेल्या दाव्याने चर्चा सुरु झाली आहे.

मागील काही महिन्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रकृती गंभीर झाल्याचं बोललं जात आहे. सर्वात शेवटी युक्रेनसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुतीन माध्यमांमध्ये दिसले होते. मात्र, त्यावेळी त्यांचा चेहरा फुगलेला दिसल्याचं बोललं जात आहे. अनेक जाणकार 69 वर्षीय पुतीन यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचाही दावा करत आहेत.

पुतीन यांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यास रशियामध्ये सत्तापालट होईल असे त्यांच्या साथीदारांना वाटत आहे. सत्तापालट झाल्यानंतर रशिया युक्रेनमधील सैन्य माघारी बोलवेल. पुतीन यांच्या मृत्यूच्या बातमीने सैन्याची ताकद कमी होईल आणि सत्तासुद्धा जाईल त्यामुळे पुतीन यांच्या मृत्यूचे सत्य लपवण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.