Chinchwad : ‘त्या’ महिला डॉक्टरचा उपचारा दरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज – सासरच्या त्रासाला कंटाळून महिला डॉक्टरने मुंग्या मारण्याचे पावडर खाऊन तसेच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये शंभर टक्के भाजल्याने डॉक्टर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

योगिता चौधरी (वय 34) असे मृत्यू झालेल्या डॉक्टर महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी पती चेतन गोविंद चौधरी, सासू रजनी गोविंद चौधरी, सासरे गोविंद चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. योगिता आणि चेतन दोघेही डॉक्टर आहेत. योगिता आणि त्यांच्या सासरच्यांची वारंवार भांडणे होत. त्यामुळे सासरच्यांनी योगिता यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी योगिता यांना समज दिली.

त्यानंतर योगिता यांनी शुक्रवारी (दि. 10) रात्री नऊच्या सुमारास मुंग्या मारण्याचे औषध घेतले. पोटात मळमळ होऊ लागल्याने त्यांनी चेतनला बोलावले. चेतनने पुन्हा त्यांना मारहाण केली. यामुळे योगिता यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. चेतन यानेही स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले आणि हातामध्ये काडीपेटी घेतली. यामुळे घाबरलेल्या योगिता यांनी चेतनच्या हातातून काडीपेटी घेत स्वतः पेटवून घेतले. यामध्ये त्या शंभर टक्के भाजल्या त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.