Chakan : वीजवाहिनीच्या मांडणीत फेरबदल केल्याने विचारणा करणाऱ्या महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील येलवाडी, सांगुर्डी, खालुम्ब्रे येथे वीज वाहिनीच्या मांडणीत तिघांनी विनापरवाना बदल केला. याबाबत चाकण (Chakan)  ग्रामीण शाखेचे अभियंता आणि त्यांचे कर्मचारी विचारणा करण्यासाठी गेले. त्यावेळी तिघांनी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 18) दुपारी तीन वाजताच्या सुमारास येलवाडी येथे घडली.

Bhosari : झोपेत असलेल्या महिलेशी गैरवर्तन

अमर उर्फ काळू शिवाजी गाडे आणि त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शाखा अभियंता रामप्रसाद सुखदेव नरवडे यांनी महाळुंगे (Chakan) एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी महावितरणची परवानगी न घेता रोहित्र पेटीतून वीजवाहिनी बंद केली. विजपुरवठा बंद करून वीज वाहिन्यांच्या मांडणीत बदल केला. याबाबत फिर्यादी, महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ आणि कर्मचारी आरोपींकडे विचारणा करण्यासाठी गेले.

त्यावेळी आरोपींनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.