Pimpri News: कोरोना बाधित रुग्ण वाढल्याने मृत्यू वाढले- आयुक्त श्रावण हर्डीकर

Death toll rises due to increases of corona patients says Commissioner Shravan मागील काही दिवसात बळींची संख्या वाढत आहे. आजपर्यंत 510 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.Hardikar

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. शहरातील रुग्णसंख्या 31 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या जास्त असल्यामुळे मृत्यूची संख्या वाढत आहे, असा खुलासा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. दिवसाला एक हजार नवीन रुग्णांची नोंद होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूच्या संख्येतही वाढ झाली आहे.

मागील काही दिवसात बळींची संख्या वाढत आहे. आजपर्यंत 510 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वयोवृद्धांसह युवकांचाही समावेश होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

शहरातील कोरोनाच्या वाढत्या मृत्यूबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरातील मृत्यूदर 1.6 टक्क्यांच्या आसपास आहे. कोरोनाची लागण जास्त लोकांना झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे.

जुलै महिन्यात मृत्यूची संख्या वाढली. ऑगस्टच्या पहिल्या 11 दिवसात 157 जणांचे मृत्यू झाले आहेत. दररोज 12 ते 15 जणांचा मृत्यू होत आहे. तर, दिवसाला नवीन एक हजार रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत.

त्यामुळे मृत्यूदर 1.5 टक्क्यांच्या आसपास आहे. कदाचित कोरोनाची लागण झालेली आहे. पण रुग्ण सापडले नाहीत असे एक हजारच्या आसपास रुग्ण अपेक्षित धरले. तर, मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षाही कमीच आहे. लागण झालेल्यांची संख्याच जास्त असल्यामुळे मृत्यूची संख्या वाढत आहे, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.