Maharashtra : शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांची घोषणा

महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर; शिवभोजन योजनेतून गोरगरिबांना 10 रुपयात जेवण; सिंचन प्रकल्पांना स्थगिती नाही

एमपीसी न्यूज – शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. त्यामुळे अतिवृष्टी, दुष्काळ आदी नैसर्गिक समस्यांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विरोधकांनी मात्र याचा निषेध केला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते मग फक्त दोन लाखांपर्यंतची कर्जमाफीच का, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. या योजनेंर्तगत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी विरोधकांनी याचा निषेध केला आहे. दरम्यान, फडणवीस यांच्या प्रश्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, विरोधी पक्ष पहिल्या दिवसापासून फक्त विरोधाची भूमिका घेत आहे. आधीच्या सरकारला शक्य झाले नाही ते आम्ही करुन दाखवलं.

– प्रत्येक जिल्ह्यामध्ये CMO कार्यालय सुरु करणार. ते कार्यालय थेट मंत्रालयातील CMO कार्यालयाला जोडलेलं असेल.
– सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थिगिती दिलेली नाही, स्थगिती देणार नाही.
– विदर्भात १२३ सिंचन प्रकल्पांचे काम सुरु आहे.
– गोसी खुर्द प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करणार.
– यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी २५३ कोटी रुपये देणार

– सिंचनाचा कोणताही अनुशेष राहिल्यास माझ्या लक्षात आणून द्या, कोणताही अनुशेष ठेवणार नाही.
– समृद्धी महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणार, कर्जामुळे व्याजापोटी पैसे द्यावे लागत होते. ते पैसे आता सरकार देईल.
– व्याजापोटी अडीच हजार कोटी वाचवले.
– कृषी समृद्धि केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना करु.
– पाच लाख लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल.
– धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिकचे २०० रुपये देणार.
– आदिवासी बांधवासाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद.
– अन्न प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्याचा विचार.
– आदिवासी मुला-मुलींना चांगल्या दर्जाचे पौष्टिक अन्न देण्यासाठी मध्यवर्ती स्वंयपाकगृह स्थापन करणार.

– पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा.
– लोणार सरोवराचं सौंदर्य संमोहित करुन सोडणार आहे.
– विदर्भात पर्यटनाच्या सोयी-सुविधा वाढवणार.
– जून २०२३ पर्यंत रखडलेले सर्व प्रकल्प पूर्ण करणार.
– विदर्भात मत्स्य व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणार.
– मिहान प्रकल्पाला काहीही कमी पडू देणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.