Alandi : आळंदीचा चैतन्य लकी चित्रपटांतून गायकाच्या रुपाने  करणार पदार्पण

माझ्यावर माऊलींची कृपा - चैतन्य देवढे

एमपीसी न्यूज  – आळंदीचा चैतन्य देवढे बनला ‘लकी’, संजय जाधव ह्यांच्या ‘लकी’मधून करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण! संजय जाधव ह्य़ांनी ‘दूनियादारी’ सिनेमातून ‘लिटील चॅम्प’ रोहित राऊतला सिनेसृष्टीत लाँच केल्यावर आता ‘राइझिंग स्टार’ चैतन्य देवढेलाही संजय जाधव लाँच करत आहेत. सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे निर्मित आणि संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ सिनेमातून गायक चैतन्य देवढे सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे.

संजय जाधव ह्यांच्या दूनियादारी सिनेमातले पंकज पडघन ह्यांनी संगीत दिलेले ‘यारा यारा फ्रेंडशीपचा खेळ सारा’ हे गाणे त्यावेळी रिएलिटी शो करणा-या रोहितल राऊतला गाण्याची संधी मिळाली होती. आता दूस-या गुणी गायकाला पून्हा एकदा संजय जाधव सिनेसृष्टीत लाँच करत आहेत. ‘संगीत सम्राट’, ‘राइझिंग स्टार’ आणि यंदा ‘सूर नवा ध्यास नवा’ अशा रिएलिटी शोमधून दिसलेला आळंदीचा ‘चैतन्य देवढे’ ‘लकी’ बॉय ठरलेला आहे.

_MPC_DIR_MPU_II

चैतन्य देवढे म्हणतो, “मी स्वत:ला खूप लकी समजतो, की सिनेसृष्टीतल्या अशा दिग्गजांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत पंकज पडघन ह्यांनी संगीतबध्द केलेली गाणी ऐकली होती. आणि संजयदादांचे सिनेमे पाहिले होते. पण ह्या दोन दिग्गजांना प्रत्यक्ष भेटायची आणि त्यांच्या सिनेमातून चित्रपटसृष्टीत लाँच होण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यावर माऊलींचीच कृपा आहे, असे मी मानतो.”

लाइव्ह प्रॉडक्शन्स आणि ड्रिमींग ट्वेंटीफोर सेव्हनची निर्मिती असलेला ,  सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे निर्मित आणि संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात अभय महाजन आणि दिप्ती सती मुख्य भूमिकेत आहेत. लकी चित्रपट 7 डिसेंबर 2018 ला महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.