Pune : डेक्कन क्वीन उद्या धावणार

एमपीसी न्यूज –  पावसामुळे रद्द करण्यात आलेली डेक्कन क्वीन उद्या तिच्या निर्धारीत वेळेत धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 

पावसामुळे पुण्याहून मुंबईला जाणा-या आणि मुंबईहून पुण्याला येणा-या डेक्कन क्वीनसह प्रगती एक्सप्रेस इंद्रायणी एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. यापैकी डेक्कन क्वीन एक्सप्रेस उद्या धावणार असून प्रगती एक्सप्रेसही आज मुंबईहून पुण्याला एकाच मार्गासाठी धावली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.