Money Fraud : कमीशन देतो सांगून तरुणीची एक लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कमीशन देतो सांगून तरुणीची एक लाख 13 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.3) दुपारी दोन ते साडे पाचच्या सुमारास घडली.

महिलेने डायना स्पेन्सर मोबाईल क्रमांक 8293151810 या क्रमांक व टेलीग्राम @jgifukf00 या खाते धारक विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Dasara melava : ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपी महिलेने ऑफरची लिंक पाठवली. यावेली वेगवेगळे टास्क सांगून ते पूर्ण केल्यानंतर कमीशन देण्याचे ठरले. त्यानुसार थोडे कमीशन दिलेही, मात्र फिर्यादीला अमेझॉन पेजवर रिचार्ज करायचे सांगून फिर्यादी यांच्याकडून 1 लाख 13 हजार 127 रुपयांचा रिचार्ज करून घेतला. मात्र कमिशन दिलेच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.