Decision On T20 WC: T20 विश्वचषकाबाबत उद्या अंतिम निर्णयाची शक्यता; ICCची महत्त्वाची बैठक

Decision On T20 WC: Final decision on T20 World Cup tomorrow; Important meeting of the ICC held on wednesday आयसीसी अध्यक्षपदाची निवड, भविष्यकाळात होणारे क्रिकेट सामने, बीसीसीआयबरोबरच्या करविषयक बाबी आणि आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अहवाल दाखल करण्याबाबत चर्चा होणार आहे.

एमपीसी न्यूज- आयसीसीच्या बुधवारी (दि.10) होणाऱ्या बैठकीत T20 विश्वचषकाबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्याची श्यक्यता वर्तवली जात आहे. ऑक्टोबर 15 ते नोव्हेंबर 15 या कालावधीत T20 विश्वचषक आयोजित करण्याबाबत विचार सुरु होता. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विश्वचषकाचे आयोजन लांबणीवर पडले होते.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार उद्या होणाऱ्या बैठकीत पाच प्रमुख मुद्यांवर चर्चा होणार आहे. यामध्ये सुरवातीला T20 विश्वचषकाबाबत निर्णय घेतला जाईल.

तसेच आयसीसी अध्यक्षपदाची निवड, भविष्यकाळात होणारे क्रिकेट सामने, बीसीसीआयबरोबरच्या करविषयक बाबी आणि आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अहवाल दाखल करण्याबाबत चर्चा होणार आहे. आयसीसीच्या 28 मे रोजी झालेल्या बैठकीत सर्व विषयांना 10 जून पर्यंत पूर्णविराम आला होता.

आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ लवकरच संपत आहे. सौरव गांगुलीने आयसीसी अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान व्हावे याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.

त्यामुळे T20 विश्वचषकाबरोबरच येणाऱ्या आयसीसी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर देखील लोकांचे लक्ष लागून आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.