Pune : ही पाणी कपात नाही पाणी चोरी आहे – विरोधीपक्ष नेते

एमपीसी न्यूज : शहराला होत असलेल्या पाणी पुरवठ्यात कपात करून दरडोई साडेअकराशे एमएलडी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. प्रत्यक्षात मात्र शहरासाठी सोळाशे एमएलडी पाणी लागत असल्याने महापालिकेला पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे. या निर्णयावर आता सत्ताधाऱ्यावर चांगलीच टीकेची झोड उठली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे या कपातीचा निषेध करण्यासाठी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आले. उंदीर घुशी कालवा फोडणारे वक्तव्य करणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली तर खेकड्याच्या कटआउटला गिरीश महाजन यांचा प्रतीकात्मक चेहरा लाऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनोख्या पद्धतीने या पाणी कपातीचा निषेध केला.

“ही पाणी कपात नसून पाणी चोरी आहे यांच्यामध्ये १६०० एमएलडी पाणी उचलल जात होत आता ते ११०० करण्यात येत आहे. हे फक्त घोषित आहे अघोषित किती होईल सांगता येत नाही याच्यामुळे कालव्यातून जे पाणी चोरून देत होते कालवा फुटून ही चोरी समोर आल्यामुळे आता यांना पाणी कपातीचे नाटक करावे लागत आहे”. असा घणाघात पुणे महापालिकेचे विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी सत्ताधारी भाजप आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर यावेळी केला.

दरम्यान, “खर तर २०० कोटी रुपये २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेसाठी शेअर मार्केट मध्ये उचलले गेले. जे तुम्ही २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना करता तर मग पाणी कपातीचा प्रश्न येतच नाही. यांना या योजनेत अजिबात रस नव्हता यांना २४ बाय ७ च्या निविदा प्रक्रियेत १००० कोटींच्या घोटाळ्यात रस होता.राष्ट्रवादी कॉंग्रेसने हा भ्रष्टाचार बाहेर काढल्याने त्यामध्ये सत्ताधार्यांना पैसे खाता येत नाही म्हणून ते पुणेकरांवर पाणी कपात लादत आहेत. सताधार्यांनी आमच आव्हान आहे यांनी पाणी कपात करूनच दाखवावी आम्ही त्यांना सळो की पळो करून सोडून”, असा दम राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी सत्ताधारी भाजपला भरला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.