Election Leave: 18 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदारांना सावर्जनिक सुट्टी जाहीर

एमपीसी न्यूज – राज्यातील 95 नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका, 2 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाडा महानगरपालिका पोट निवडणुकांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होत आहे. या मतदानासाठी संबंधित मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्यासाठी सावर्जनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही सावर्जनिक सुट्टी खाली नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निम शासकीय कार्यालये, सावर्जनिक उपक्रम, बॅंका इत्यादींना ही सावर्जनिक सुट्टी लागू राहणार आहे.

राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील 95 नगरपंचायतींकरिता तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी 7 पंचायत समित्या आणि सांगली-मिरज-कुपवाडा या एका महानगरपालिकेच्या पोट निवडणुकांकरिता ही सावर्जनिक सुट्टी असेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.