Pune News : ‘सरसेनापती हंबीरराव टीम’च्या मोफत रुग्णवाहिकेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज – आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या मराठी चित्रपटाचे निर्माते संदीप रघुनाथराव मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून मोफत रुग्णवाहिका या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

राज्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट असताना समाजहितासाठी काहीतरी करण्याचा विचार टीम सरसेनापती हंबीररावच्या मनात होता. त्यादृष्टीने आज पासून (शनिवारी) टीम सरसेनापती हंबीरराव तर्फे एक सामाजिक बांधिलकी म्हणून पुणे शहरासाठी ऑक्सिजनसह सर्व सोई सुविधायुक्त विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. ही रुग्णवाहिका संपूर्ण पुणे शहरासाठी विनामूल्य उपलब्ध आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे शहरात या मोफत सेवेसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संदिप मोहिते पाटील आणि सौजन्य निकम यांनी केले.

– 8208433345 / 7775078167

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.