Maval News : भोयरे गावात विविध विकासकामांचे लोकार्पण व नवीन कामांचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील भोयरे गावात विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच यावेळी नवीन विकासकामांचे भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला. भोयरे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ठाकरवस्ती मधील डिजिटल अंगणवाडीसाठी आलेले साहित्य यावेळी वाटप करण्यात आले.

राष्ट्रीय एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान भोयरे ता.मावळ या ठिकाणी संपन्न झाले.

या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा सुदाम कदम,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण  ठाकर,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अंकुश आंबेकर,भोयरे गावचे लोकनियुक्त सरपंच बळीराम राणूजी भोईरकर, ग्रामसेविका प्रमिला सुळके,आंदर मावळ राष्ट्रवादी महिला अध्यक्ष घोलप सुदामराव कदम युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ पडवळ,सुपरवायझर शेख मॅडम, भरत आंभोरे,माणिक तांबोळी समीर कदम तसेच ग्रा. उपसरपंच मंगला आडिवळे ग्रा.सदस्या मीराबाई जांभुळकर,ग्रा.सदस्य तानाजी खडके,ग्रा.सदस्य वर्षा जांभूळकर, तसेच अंगणवाडी सेविका मंदा आडिवळे,रुपाली भोईरकर,  मदतनीस आशा डोळस तसेच आंदर मावळ मधील सर्व अंगणवाडी सेविका आशा वर्कर,ग्रामपंचायत कर्मचारी,सेव द nचिल्ड्रनचे इंगवले व त्यांचे सहकारी व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.