Ravet News : स्त्री शक्तीचा जागर करावा – दीपक भोंडवे

एमपीसी न्यूज – महिलांमध्ये देवीची नऊ रुपे आहेत तसेच राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श देखील आपल्याकडे आहे. महिलांनी आपल्यातील ह्या स्त्री शक्तीचा जागर करून येणाऱ्या संकटांवर मात करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे यांनी कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले.

नवरात्रोत्सव व जागतिक कन्या दिनाचे औचित्य साधून रावेत परिसरातील विविध क्षेत्रातील एकूण ५६ रणरागिणींना कर्तबगार महिला व कन्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ५६ रणरागिणींना  ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ व सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सामाजिक कार्यकर्ते दीपक मधुकर भोंडवे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यकमासाठी आंतरराष्ट्रीय शूटर प्राची गडकरी, अध्यक्षस्थानी अंजली जाधव उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रवादी महिला बचत गट महासंघ अध्यक्ष शिला भोंडवे, कस्टम अधिकारी सुवर्णा अथनीकर व सुप्रिया भोंडवे सुद्धा उपस्थित होत्या.

या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पा किटाळीकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय समृद्धी जाधव यांनी तर आभार डॉ अरुणा निकम यांनी मानले तसेच रत्नाकर करंकाळ, सुरेश किटाळीकर, गणेश वारे, श्रीकांत नवले, श्रीकांत देशपांडे, अनिरुद्ध खन्नाडे, डॉ. विठ्ठल चोपडे, सुनील भोंडवे, संतोष भोंडवे, धनंजय सोळुंके, अशोक करमारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.