BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : प्रा दीपक बिचे यांच्या ‘ तुका झाला पांडुरंग ‘ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार जाहीर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील व्याख्याते सूत्रसंचालक, लेखक व विविध संस्थेत विविध पदावर कार्यरत असणारे प्रा दीपक बिचे यांच्या “तुका झाला पांडुरंग ” या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा संत साहित्य विषयक ग्रंथास वासुदेव धोंडो आणि भागीरथीबाई पुरस्कार जाहीर झाला आहे.

सरस्वती सन्मान प्राप्त झालेले प्रसिद्ध गुजराथी साहित्यकार सीतांशू यशचंद्र यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषेदेच्या वर्धापन दिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख रक्कम प्रमाणपत्र व गौरवचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रा. दीपक बिचे यांची संत साहित्यावर संत शिरोमणी बाबा नामदेव, वारी एक आनंद सोहळा व पसायदान ही पुस्तके प्रकाशित झालेले आहेत. सात पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. मावळ तालुक्यातील कला,साहित्य,संगीत,शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात विविध संस्थेत ते कार्यरत आहेत. मावळ तालुक्यातील लेखकाला हा बहुमान मिळत आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल बिचे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

HB_POST_END_FTR-A2

.