Pune Crime Update: दीपक मारटकर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार जेरबंद

बाप्पू नायर टोळीचा गुंड कराडमधून अटक

एमपीसी न्यूज : पुण्यातील कसबा युवा सेनेचे विभाग प्रमुख दिपक मारटकर यांची 2 ऑक्टोबरच्या रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली आहे. तर यातील मुख्य सूत्रधार स्वनिल उर्फ चॉकलेट मोडवे याला कराडमधून अटक करण्यात आली आहे. 

स्वनिल उर्फ चॉकलेट मोडवे हा त्यात बापू नायर टोळीचा सक्रिय सदस्य आहे. सध्या तो टोळीचा मुख्य सूत्रधार म्हणूनही काम करतो. गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस कर्मचारी अमोल पवार व अजय थोरात यांना मोडवे हा कराड येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने कराड येथे जाऊन त्याला अटक केली. त्याच्याविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यासारख्या सहा गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.
दिपक मारटकर खून प्रकरणातील सर्वच्या सर्व म्हणजे दहा आरोपींवर पुणे पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. अश्विनी सोपान कांबळे ( वय 25, बुधवार पेठ), महेंद्र मदनलाल सराफ (वय 57) आणि निरंजन सागर महंकाळे (वय 19) सनी कोलते, राहुल रागिर, रोहित क्षीरसागर, रोहित कांबळे, संदीप उर्फ मुंगळ्या प्रकाश कोलते (वय 23) आणि लखन मनोहर ढावरे (वय 30) यांना अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.