Pune : महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी ज्येष्ठ नगरसेविका दीपाली धुमाळ यांची निवड

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी ज्येष्ठ नगरसेविका दीपाली बाबा धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे.

या पदासाठी माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेविका नंदा लोणकर, अश्विनी कदम, नगरसेवक योगेश ससाणे, महेंद्र पठारे, सचिन दोडके इच्छुक होते. त्यामधून दीपाली धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे. आगामी काळात 1 – 1 वर्षे हे पद असणार असल्याचे राष्ट्रवादीतर्फे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार दिलीप बराटे यांना वर्षभरासाठी हे पद देण्यात आले होते.

तर, पक्षाने माझी निवड केल्याने आभारी असून, आगामी काळात शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे दीपाली धुमाळ यांनी सांगितले. यावेळी पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, नगरसेवक सचिन दोडके, अरुण पाटील उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.