Bhosari Crime : इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार करत महिलेची बदनामी
एमपीसी न्यूज – इन्स्टाग्रामवर खोटे अकाऊंट तयार करत (Bhosari Crime) महिलेची बदनामी करणाऱ्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 27 ते 29 जानेवारी या कालावधीत घडला.
याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून प्रदिप गुज्जर (रा. हरियाणा)याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ravet News : डोक्याला पिस्टल लावून तरुणाला लुटले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फेक अकाऊंट तयार करत त्यावर अश्लिल फोटो टाकत महिलेची बदनामी केली. (Bhosari Crime) याचा जाब फिर्यादी यांनी विचारला असता आरोपीने त्यांना फोटो हटवण्यासाठी पुन्हा अश्लिल मागणी केली व एकले नाही तर मुलीचे खोटे इन्स्टा अकाउंट तयार करण्याची धमकी दिली. तसेच फोटो व्हायरल कऱण्याची धमकी दिली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.