Sangvi Crime News : तरुणाची फसवणूक करून अश्लील व्हिडीओ बनवत नातेवाईकांना पाठवून बदनामी

एमपीसी न्यूज – तरुणाकडे पैशांची मागणी करून पैसे न दिल्याने शिवीगाळ केली. त्यानंतर तरुणाच्या कागदपत्रांचा वापर करून अश्लील व्हिडीओ बनवून त्याच्या नातेवाईकांना पाठवून बदनामी केली. हा प्रकार 31 मे ते 4 जून या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला.

कृष्णा शिवा मिश्रा (वय 26, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 7797141875, 8079693384, 9779886543607, 7043415941, 8765707538, 7653972400, 9477448724, +13005335099, 8084472858, 7179928638, 9334992659, +35310456688 या क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talavade Crime News : तरुणावर कोयत्याने वार करून मोबाईल पळवला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल धारक आरोपींनी EULAVT LOAN या नावाचे बनावट अॅप्लिकेशन तयार केले. त्याआधारे फिर्यादीस तीन हजार 850 रुपये ऑनलाईन पाठवले नसतानाही पाठवले असल्याचे सांगून फिर्यादीकडे सात हजारांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला, त्यामुळे आरोपींनी शिवीगाळ केली.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या फोटोंचा वापर करून त्यावर अश्लील मजकूर लिहिला. ओळखपत्रांचा वापर करून अश्लील व्हिडीओ एडिट करून तो व्हिडीओ फिर्यादी यांच्या बहिणीच्या मोबाईलवर पाठवला तसेच इतर नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.