Pune : पुरेसे पाणी न दिल्याने हडपसर व वडगावशेरी मतदारसंघांत पराभव

भाजपच्या बैठकीत चर्चा

एमपीसी न्यूज – हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत पुरेसे पाणी न दिल्यानेही पराभव झाल्याची चर्चा भाजपच्या बैठकीत करण्यात आली. या दोन्ही मतदारसंघांतील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. या मागची कारणे शोधण्यात येत आहेत. या दोन्ही मतदारसंघांत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे.

_MPC_DIR_MPU_II

नगररोड, लोहगाव, धानोरी भागात 8 – 8 दिवस पाणी येत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केल्या होत्या. पण, पदाधिकारी आणि प्रशासन यांनी कोणत्याही खबरदारी घेतल्या नाही. हडपसर मतदारसंघातही नगरसेवकांनी वारंवार पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी मांडल्या. दोन वेळ पाणीपुरवठा करण्याची सातत्याने मागणी करण्यात आली.

मात्र, काहीही नियोजन करण्यात आले नाही. राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात पाण्यासाठी भाजप आंदोलने करायची. आज मात्र केंद्रापासून, राज्य आणि पुणे महापालिकेत एक हाती सत्तेत असलेल्या भाजपला पुणेकरांना दोन वेळ आणि चांगल्या दाबाने पाणीपुरवठा देता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1