Maval : सुनील शेळके यांना निवडून आणण्यासाठी देहूरोड मनसे कार्यकर्त्यांची जोरदार मोर्चेबांधणी

शेळकेंच्या प्रचारार्थ देहूरोडमध्ये काँग्रेस-मनसेची पदयात्रा

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, एस आर पी मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी जाहीर पाठिंबा दिलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना देहूरोडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटले असून त्यादृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यानुसार देहूरोड शहरातून मनसे आणि काँग्रेस पक्षातर्फे पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

मनसे मावळ तालुकाध्यक्ष मोझेस दास यांनी मतदारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मावळ तालुक्याच्या नेतृत्वासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके हेच सक्षम उमेदवार आहेत. तालुक्यातील विकासकामांसह गोर गरिबांना मदत करून त्यांनी जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणणे हे केवळ मावळवासीयांचेच नव्हे, तर देहूरोडकरांचेही कर्तव्य आहे. शेळकेंना बहुमताने निवडून आणण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मेहनत घ्यावी, असे आवाहन दास यांनी केले.

याप्रसंगी शहराध्यक्ष जॉर्ज दास, किरण गवळी, डॉमनिक दास, प्रवीण मुथू, शुभम जाधव, आकाश भिसे, काँग्रेसचे दीपक चौगुले, जलाल शेख, चंद्रशेखर पात्रे, लक्ष्मण ढिलोड, विकी ढिलोड, संदीप बाहोत, संदीप डूलगज, विद्या ढिलोड, अनिता मंगवानी, ब्रिजेश मंगवानी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.