Dehu Crime News : गाडी व्यवस्थित रिपेअर केली नाही म्हणून मॅकेनिकला मारहाण

एमपीसी न्यूज – दुरुस्तीसाठी दिलेली गाडी मॅकेनिकने व्यवस्थित दुरुस्त केली नाही, यावरून गाडी मालकाने मॅकेनिकला मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 9) दुपारी साडेचार वाजता देहूगाव येथील श्री स्वामी समर्थ गॅरेज जवळ घडली.
सचिन चंद्रकांत शिंदे (वय 39, रा. देहूगाव) असे जखमी मॅकेनिकचे नाव आहे. याबाबत त्यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दत्त भसे, सोपान भसे (दोघे रा. देहूगाव) आणि अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भसे याने त्याची गाडी दुरुस्तीसाठी फिर्यादी शिंदे यांच्या गॅरेजमध्ये दिली होती. गॅरेजमधून गाडी घेऊन जाताना फिर्यादी यांनी गाडी व्यवस्थित दुरुस्त केली नसल्याचे आरोपींना वाटले. त्यावरून आरोपींनी फिर्यादी मॅकेनिक शिंदे यांना डोक्यात मारून जखमी केले.
देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.