Dehu: देहूत तुकाराम बीज सोहळा उत्साहात, कोरोनाच्या भीतीने वारक-यांच्या संख्येत घट

एमपीसी न्यूज – देहूगावमध्ये तुकाराम-तुकाराम’चा नामघोष करत भक्तांनी नांदुरकी वृक्षाच्या दिशेने पुष्पवृष्टी केली अन् तुकाराम बीजेचा 372 वा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. दरम्यान, यंदा देशावर ‘कोरोना’चे सावट आहे. ‘कोरोना’च्या भीतीने वारक-यांनी सोहळ्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. दरवर्षीपेक्षा सोहळ्यात वारक-यांच्या संख्येत यंदा घट दिसून आली.

संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्यभरातून देहूत भाविक येतात. परंतु, यंदा ‘कोरोना’ने थैमान घातले आहे. पुण्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापार्श्वभुमीवर यंदा वारक-यांनी देखील बीज सोहळ्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

संस्थानच्या वतीने सोहळ्यानिमित्त मंदिरांमध्ये महापूजा, अभिषेक, काकडा आरती आदी धार्मिक विधी करण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षाच्या दिशेने पुष्पवृष्टी केली आणि बीज सोहळा संपन्न झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.