Dehu Gambling: देहुगावात जुगार अड्ड्यावर छापा, 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

 एमपीसी न्यूज : देहुगाव येथे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकाने कारवाई केली असून 26 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात देहुगावचे प्रतिष्ठीतही पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. (Dehu Gambling) या कारवाईत 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.2) ऱात्री उशीरा करण्यात आली.

यामध्ये पोलिसांनी शेखर गुलाब परंदवड (वय 50 रा. देहुगाव) व इतर 25 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुगाव ते येलवाडी रोडच्या उजव्या बाजूस एस.एच. ई. पी.एल हेव्ही इंडस्ट्रीयल फ्यब्रिक्रेशन लिमिटेड कंपनीच्या दुसर्‍या मजल्यावर एकूण 20 ते 25 जण टेबलावर तीन पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. (Dehu Gambling) त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून 26 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी पाच लाख 33 हजार 270 रुपये , 2 कार 18 दुचाकी व 27 मोबाईल व इतर जुगाराचे साहित्य असा एकूण 35 लाख दहा हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात जुगार खेळणारे देहुगावचे प्रतिष्ठीतही पोलिसांच्या गळाला लागले आहेत.

 

PHD Entrance: पुणे विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित, संशोधन केंद्रांकडून रिक्त जागांची माहिती मागवली

 

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास इंगवले व पोलिस उप-निरीक्षक मंगेश भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक कांबळे, बनकर, माने, कोकणे, कौशल यांनी केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.