Dehu Garbage: कचरा टाकणाऱ्या टेम्पो ड्रायव्हरला स्थानिक नागरिकांनी दिली समज

एमपीसी न्यूज: कचरा टाकणाऱ्या टेम्पो ड्रायव्हरला स्थानिक नागरिकांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. (Dehu Garbage) या टेम्पो ड्रायव्हरने टाकलेला कचरा व आजूबाजूला पडलेला कचरा स्थानिकांनी या टेम्पो ड्रायव्हरलाच उचलायला लावला आहे.

 

Vice Presidential Elections : जगदीप धनखड नवे उपराष्ट्रपती

 

काल शनिवारी 6 ऑगस्ट ला दुपारी देहू गावा जवळील भंडारा डोंगराच्या पायथ्याशी कचरा टाकणाऱ्या टेम्पो ड्रायव्हरला स्थानिक नागरिकांनी त्याने टाकलेला कचरा व आजूबाजूला पडलेला कचरा परत न्यायला लावला. (Dehu Garbage) या टेम्पो ड्रायव्हरने येथील नागरिकांची  माफी मागितल्याने त्याची सुटका झाली. नागरिकांनी अशा कचरा बहाद्दरांना जागीच समज दिल्यास परिसर स्वच्छ राहील.यावेळी पोलिस सहाय्यकही मदतीस आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.