Dehu : जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठात ‘शिवजयंती उत्सव आनंदात साजरा’

एमपीसी न्यूज- जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँन्ड ज्यु.कॉलेज मध्ये शिवजयंती उत्सव ( Dehu) आनंदात साजरा करण्यात आला.त्यावेळी संतपीठाचे संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे, संचालिका डॉ.स्वाती मुळे, प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार, पूर्वप्राथमिक विभागाच्या समन्वयिका मयुरी मुळूक उपस्थित होते.

संतपीठाचे प्रा. डॉ.ज्ञानेश्वर गाडगे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या.

Tata Group of Company : पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठा आहे टाटा उद्योग समूह

पूर्वप्राथमिक विभागातील सिनियर के.जी. च्या वर्गातील विद्यार्थी आराध्या खांडेकर, अश्विता कुऱ्हाडे,ईशान्वी पवार, तसेच इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थी प्रत्यूष लोंढे याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे सादर केले. सोहंम शिंदे, आर्जित कराड यानी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती सांगितली. इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आणि पूर्वप्राथमिक विभागातील शिक्षिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित नृत्य केले. संस्कृत विषयाचे शिक्षक सखाराम पितळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म ते त्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगितला. संतपीठ शाळेपासून पाटील नगर मध्ये कानिफनाथ मंदिरापर्यंत शिवघोष मध्ये शिवमुर्ती ची मिरवणूक काढण्यात आली.

यामध्ये संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे, प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर गाडगे शाळेतील पूर्व प्राथमिक, प्राथमिक विभागाचे सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संत साहित्य विषयाचे शिक्षक राजाराम फड यांनी केले व आभार प्रदर्शन सखाराम पितळे यांनी ( Dehu) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.