Dehu News : बागेश्वर महाराजांना देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराजांनी का केले माफ?

एमपीसी न्यूज : सध्या चर्चेत असलेल्या बागेश्वर महाराज (Dehu News) यांनी संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी यांच्याबद्दल केलेल्या विधानाने वारकरी सांप्रदायाने आक्रमक भूमिका घेतली होती. एकीकडे भाजपचे तुषार भोसले यांनी निषेध व्यक्त केला असताना दुसरीकडे मात्र संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा दाखला देत देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी बागेश्वर महाराज यांना माफ केले असून वारकऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये असे आवाहनही केले आहे.

बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कुमार शास्त्री यांनी आपल्या प्रवचनात तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी यांच्याबद्दल विधान केले होते. हा दाखला चुकीचा असल्याने वारकरी संप्रदायाने आक्रमक भूमिका घेतली होती. यावर विश्वस्त मोरे यांनी प्रतिक्रिया दिली, की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेदभ्रम अमंगळ ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल तें हित सत्य करा..त्यांच्या पत्नी यांची पतिव्रता आणि त्यागाची भूमिका होती. त्यामुळे कोणीही चिंतनीय असे वक्तव्य करू नये. वारकरी सांप्रदाय हा बंबाजी,रामेश्वर भट्टांना माफ करणारा पंथ आहे.

Mulshi : कागदपत्र देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाकडे लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्याला अटक

त्यामुळे मी बागेश्वर महाराज यांना माफ करतो. वारकरी सांप्रदायाने कोणतीही प्रतिक्रिया याबद्दल देऊ नये. आपला पंथ आहे हा माफ करणारा आहे. बागेश्वर महाराजांनी पुढे बोलताना संदर्भ घेऊन बोलावे, माहिती घेऊन बोलावे तसेच शासनाला माझी विनंती आहे, की संतांवर बोलणाऱ्या व्यक्तीविरोधात एक कायदा (Dehu News) आणला पाहिजे. त्यामुळे अशा विकृती उदयाला येणार नाहीत. अशी भूमिका त्यांनी मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.