Dehu News: देहूतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

एमपीसी न्यूज- आमदार सुनील शेळके यांनी देहू नगर पंचायतीतील 16 नवनिर्वाचित नगरसेवकांसह पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (शनिवारी) पुणे येथे भेट घेतली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, देहू शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, माजी सभापती कांतीलाल काळोखे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष प्रवीण झेंडे, बाळासाहेब काळोखे, माजी उपसरपंच स्वप्नील काळोखे,
नवनिर्वाचित नगरसेवक सुधीर काळोखे, योगेश काळोखे, प्रवीण काळोखे, आदित्य टिळेकर, योगेश परंडवाल, मयूर शिवशरण, मीना कुऱ्हाडे, रसिका काळोखे, पूजा दिवटे, अनिता हगवणे, स्मिता चव्हाण, पौर्णिमा परदेशी, सपना मोरे, पूनम काळोखे, प्रियांका मोरे, ज्योती टिळेकर आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा देताना म्हणाले, ‘देहूकरांनी भरभरून दिलेल्या मतदानाबद्दल देहूच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. तसेच देहूमधील पाणी योजना,भूमिगत गटर योजना यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देऊ, त्यासाठी आवश्यक प्रक्रियेचा तातडीने पाठपुरावा करा व देहूकरांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी जनतेची सेवा करा.’

देहू नगर पंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवून 17 पैकी 16 नगरसेवक निवडून आल्याने उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदार सुनील शेळके व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. देहू सारख्या शहरात राष्ट्रवादी कॉंगेसची एकहाती सत्ता आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.