Dehu News: ‘कोरोनामुळे दगावलेल्या छावणीतील सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला 50 लाखांचे विमा संरक्षण द्या’

देहुरोड छावणी परिषदेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कर्तव्यावर असलेले रणधीर किसनलाल बांधल यांचा कोरोनाचा संसर्ग झाला व त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज – देहूरोड छावणी परिषदेमध्ये कर्तव्यावर असणारे सफाई कर्मचारी यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटूंबाला 50 लाखाची विमा संरक्षण रक्कमेबरोबरच देहूरोड छावणी परिषदेने आर्थिक मदत करावी अशी मागणी मानवी हक्क संरक्षण जागृतीचे अध्यक्ष विकास कुचेकर व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी देहूरोड छावणी परिषदेचे रामस्वरुप हरितवाल यांना निवेदनाव्दारे केली आहे.

देहुरोड छावणी परिषदेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कर्तव्यावर असलेले रणधीर किसनलाल बांधल यांचा कोरोनाचा संसर्ग झाला व त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. यांच्यावरच कुंटुबाची उपजिविका अवलंबून असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पंतप्रधान यांनी या कोरोना काळात कर्तव्यावर कोरोनायोद्धांना 50 लाखाचे विमा संरक्षण देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे देहूरोड छावणी परिषदेमध्ये कर्तव्यावर असणारे सफाई कर्मचारी यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटूंबाला 50 लाखाची विमा संरक्षण रक्कमेबरोबरच देहूरोड छावणी परिषदेने आर्थिक मदत करावी अशी मागणी मानवी हक्क संरक्षण जागृतीचे अध्यक्ष विकास कुचेकर, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी देहूरोड छावणी परिषदेचे रामस्वरुप हरितवाल यांना निवेदनाव्दारे केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.