Dehu: दिलासादायक ! देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज एकही रूग्ण नाही तर 8 जण कोरोनामुक्त

Dehu: No patient in Dehuroad Cantonment Board today, 8 corona free गेल्या काही दिवसांपासून पारशी चाळ परिसरात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कॅन्टोन्मेंट प्रशासनाने हा परिसर मायक्रो कंटेन्मेन्ट झोन जाहीर केला आहे.

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज (दि.26) एकही कोरोना रूग्णाची नोंद झाली नाही. मात्र, आजही कॅन्टोन्मेंट बोर्डात 18 सक्रिय रूग्ण आहेत. आज 8 कोरोनामुक्त रुग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पारशी चाळ परिसरात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कॅन्टोन्मेंट प्रशासनाने हा परिसर मायक्रो कंटेन्मेन्ट झोन जाहीर केला आहे.

त्यामुळे आजपर्यंत हद्दीत एकूण 236 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस दिला आहे. त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत एकही नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली नसल्याचे म्हटले आहे.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 236 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 18 रुग्ण रुग्णालयात दाखल असून, 99 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आजपर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 82 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजपर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.