Dehu : दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा (Dehu) मृत्यू झाल्याची घटना देहू गावात 22 नोव्हेंबर रोजी घडली. या अपघातामध्ये पुणेकर भोसले (वय 60 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मयताच्या मुलगा राहुल भोसले (वय 39 वर्षे, रा. लक्ष्मी नगर, हवेली) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Bhosari : एकतर्फी प्रेमातून पती आणि आई-वडिलांसमोर महिलेचा विनयभंग

फिर्यादीचे वडील नेहमीप्रमाणे भाजी आणण्यासाठी (Dehu) गेले होते. त्यावेळेस स्टील कंपनीजवळ भाजीपाला विकायला बसणाऱ्यांसमोर आरोपी टुव्हीलर चालकाने बेजबाबदारपणे फिर्यादीच्या वडिलांना धडक दिली. यामध्ये पुणेकर भोसले गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.