Dehu : तयारी पालखीची; संत तुकाराम महाराज पालखी रथाला झळाळी

एमपीसी न्यूज – देहुतील देऊळवाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील चांदीचा महिरप आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील भाविकांचे आकर्षण असलेला चांदीचा रथ, पालखी, अब्दागिरी, गरुडटक्के, माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना झळाळी देण्यात आली. पिंपरीतील वर्मा ज्वेलर्सचे घनश्याम वर्मा यांच्या सहका-यांनी हे काम केले आहे.

संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात विठ्ठल-रुक्मिणी स्वयंभूमूर्ती आहे. तसेच पालखी सोहळ्यात आवश्यक असलेले पुजेचे ताट, साहित्य, पालखी, अब्दागिरी, गरुडटक्के, माऊलींच्या पादुका, संत तुकाराम महाराजांच्या पादुका, चांदीचा पाट, दानपेटी यांना चकाकी करण्यात आली.

  • पारंपारिक पध्दतीचा वापर करुन ही चकाकी देण्यात आली. त्यात रिठा, लिंबु, चिंच पावडर वापरण्यात आली. वर्मा ज्वेलर्सने ही सेवा दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.