Dehu Road : दारू पिण्यावरून ज्येष्ठ नागरिकाला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – दारू पीत असताना ( Dehu Road ) किरकोळ कारणावरून ज्येष्ठ नागरिकाला डोक्यात दगड मारत जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.27) दुपारी देहुरोड येथे घडला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संदिप कंचन शर्मा (वय 54 रा.निगडी) यांला अटक केली असून मरीयप्पा हनुमंत हिरेमठ हे यात जखमी झाले आहेत. याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात रविवारी (दि.28) मरीअप्पा सायबन्ना विटकर (वय 54 रा. देहुरोड) यांनी फिर्याद दिली आहे.

Dehugaon : दूषित पाण्यामुळे इंद्रायणीत दररोज शेकडो माशांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी हे फिर्यादीचे सासरे आहेत. शनिवारी फिर्यादी त्यांचे सासरे व आरोपी हे दारू पीत बसले होते. यावेळी दारू पिण्यावरून आरोपी व फिर्यादीचे सासरे यांच्यात वाद झाला. आरोपीने रागाच्या भरात तुला मारून टाकेन म्हणत मरीयप्पा यांना दगडाने मारहाण केली. यावरून देहुरोड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत  ( Dehu Road ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.