Dehu Road: देहूरोड किवळे ब्रिजवर 29 टन डांबर घेऊन जाणारा टँकर उलटला; चालक जखमी

Dehu Road: A tanker carrying 29 tonnes of asphalt overturned हा टँकर बीटकॉल ट्रान्सपोर्ट कंपनीचा असल्याची माहिती समोर आली आहे.

एमपीसी न्यूज- मुंबईवरून सांगलीला 29 टन डांबर घेऊन जाणारा टँकर मुंबई-पुणे महामार्गावरील देहूरोड किवळे ब्रिजवर उलटला. या अपघातात टँकरचा चालक जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात टँकरचा चालक राहुल यादव गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. हा टँकर बीटकॉल ट्रान्सपोर्ट कंपनीचा असल्याची माहिती समोर आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

घटना स्थळी आयआरबी कर्मचाऱ्यांनी धाव घेत रस्त्यावर सांडलेले डांबर साफ केले आहे. अपघातानंतर काही वेळाकरिता पुण्याला जाणारी एक लेन बंद ठेवण्यात आली होती.

View this post on Instagram

देहूरोड किवळे ब्रिजवर 29 टन डांबर घेऊन जाणारा टँकर पलटी; चालक जखमी . मुंबई वरून सांगलीला 29 टन डांबर घेऊन जाणारा टँकर मुंबई पुणे महामार्गावरील देहूरोड किवळे ब्रिजवर पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे.  . For more details check out our website Link in bio . #mpcnews #i_support_mpcnews #marathinews #marathinewsupdates #news #mavalnews #latestupdates #dehuroad #mumbaipunehighway #accident #accidenthappened

A post shared by MPC News Pvt. Ltd. (@mpcnews.in) on

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.