मंगळवार, जानेवारी 31, 2023

Dehu road : महिलेची गाडी अडवून हिसकावले मंगळसूत्र

एमपीसी न्यूज चैन स्नॅचींग करणारे आता अगदी खुले आम वावरत असून केवळ रात्रीच नाही तर दिवसा देखील ते सोनासाखळी चोरत आहेत. (Dehu road) देहूरोड येथे दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला अडवून चोरट्याने गाडीखाली उतरवून रोडच्या कडेला खेचत नेले व तिच्या गळ्यातले मंगळसुत्र हिसकावले. हा सारा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.2) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास घडला.

याप्रकऱणी 24 वर्षीय महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Moshi News : गुटखा साठवणूक प्रकरणी तरुणाला मोशी येथून अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या दुचाकीवरून ऑफीसला जाण्यासाठी निघाल्या होत्या शेलारवाडी पुलाजवळ येताच चोरटा त्याची दुचाकी घेऊन फिर्यादीच्या गाडीच्या आडवा आला. फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी थांबवली असता आरोपीने फिर्यादीला गाडीच्या खाली उतरवले.(Dehu road) तसेच त्यांना रोडच्या कडेला खेटून नेत त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्ती हिसकावून घेत तो पसार झाला.  याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र या घटनेने केवळ पायी चालणाऱ्या महिला नाही तर आता दुचाकीवरील महिला देखील टार्गेट होत असल्याचे समोर आले आहे.

Latest news
Related news