Dehu Road Crime News : घरासमोर कचऱ्याचा डब्बा ठेवला म्हणून शेजाऱ्याचे डोके फोडले

एमपीसी न्यूज  – घरासमोर कचऱ्याचा डब्बा ठेवला म्हणून शेजाऱ्यानेच शेजाऱ्याचे डोके फोडले. ही घटना बुधवारी (दि.25) देहुरोड (Dehu Road Crime News ) येथे घडली आहे.

याप्रकरणी तुळजाम्मा सिद्धू कुंचिकर (वय 28 रा.देहुरोड) यांनी फिर्याद दिली असून सुनकप्पा आण्णारेड्डी, टिंकू यल्लाप्पा आण्णारेड्डी, सागर आण्णारेड्डी सर्व राहणार देहुरोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dapodi Crime News : घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत दिली धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी कचऱ्याचा डब्बा घरासमोर ठेवला म्हणून आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करत हाताने मारहाण केली व पाठीमागून दगड मारून जखमी केले. यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Dehu Road Crime News ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.