Dehu road crime : तडीपारीचा आदेश भंग करून शहरात आलेल्या आरोपीस अटक

एमपीसी न्यूज : तडीपारीचा आदेश भंग करून शहरात आलेल्या आरोपीस (Dehu road crime) देहू रोड पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी चाकू हातात घेऊन मोठ्याने ओरडून तेथील लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

कुणाल वाल्मिकी वय 26 वर्षे रा. श्रीकृष्ण नगर, एमबी कॅम्प, देहूरोड ह्या आरोपीस 28 सप्टेंबरला दुपारी 3.30 वा चे सुमारास अटक करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 142, भारतीय शस्त्र कायदा 4(25), क्रिमिनल लॉ ऍक्ट 7 प्रमाणे देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jayant Patil : अशोक चव्हाण यांनी जो गौप्यस्फोट केला त्यात तथ्य असणं स्वाभाविक आहे – जयंत पाटील

पोलीस उप-आयुक्त परिमंडल दोन, पिंपरी चिंचवड यांनी 30 जुलैला महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 (1) (अ) (ब) प्रमाणे पुणे जिल्ह्यातील हद्दीतून दोन वर्ष कालावधी करिता 3 ऑगस्ट 2022 ते 2 ऑगस्ट 2024 झाले असतानाही त्याने न्यायालयाची किंवा पोलीस उप-आयुक्त,(Dehu road crime) परिमंडल दोन यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता प्रतिबंधित क्षेत्रात शिंदे पेट्रोल पंपा समोरील सार्वजनिक रोड वर चाकू हातात घेऊन मोठ्याने ओरडून तेथील लोकांमध्ये दहशत निर्माण करताना दिसला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.