Dehuroad: संशयाच्या रागातून डोक्यावर कोयत्याने वार करून पत्नीचा खून

Dehu road: Murder of wife by stabbing her in the head out of anger आरोपी करिमशा हा फिर्यादी आयान शेखचा सावत्र वडील आहे. फिर्यादीची आई आबेदा शेखवर आरोपी करिमशाने संशय घेतला.

एमपीसी न्यूज- पत्नीवर संशय घेऊन तो राग मनात ठेवत डोक्यावर व दोन्ही हातांवर कोयत्याने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना साईनगर, देहूरोड येथे रविवारी (दि.5) सकाळी सव्वा आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आबेदा करिमशा शेख (वय. 32, रा. वाघजाई सोसायटी, साईनगर, ता. मावळ, जि.पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

करिमशा अहमद शेख (रा. साईनगर, ता. मावळ, जि.पुणे) असे आरोपी पतीचे नाव असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

याप्रकरणी आयान करिमशा शेख (वय.14, रा. वाघजाई सोसायटी, साईनगर, ता. मावळ, जि.पुणे) याने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी, आरोपी करिमशा हा फिर्यादी आयान शेखचा सावत्र वडील आहे. फिर्यादीची आई आबेदा शेखवर आरोपी करिमशाने संशय घेतला.

या संशयाचा राग मनात ठेवत त्याने पत्नीच्या डोक्यावर व दोन्ही हातावर कोयत्याने वार करत तिला ठार मारले. देहूरोड पोलिस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.