Dehu Road News : स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक, श्रीजीत रमेशन यांची तक्रार

एमपीसी न्यूज – देहूरोड परिसरातील स्कूलमध्ये (Dehu Road News) अनेक विद्यार्थ्यांची खासगी वाहनातून विनापरवानगी वाहतूक केली जाते. फिटनेस नसलेल्या वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी केली आहे.

याबाबत देहूरोडच्या (Dehu Road News) वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे रमेशन यांनी तक्रार केली आहे. या शाळेतील अनेक वाहनांमध्ये फिटनेस नाही. वाहनांचा विमाही आणि स्कूल बस परमिटसुद्धा नाही. प्रत्येक वाहनात विद्यार्थ्यांची जास्त गर्दी असते.

मी फक्त सत्य बोललोय, तुमचा आत्मा मेलाय म्हणून तुम्ही जिवंत मुडदे बनलायत : संजय राऊत

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा वाहनधारकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रमेशन यांनी केली आहे.

Maharashtra Political Crisis : शहर शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास, बंडखोरांना महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा उरली नाही

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.