BNR-HDR-TOP-Mobile

Dehu : सुनील शेळके यांनी सोडवली माऊली सोसायटीतील रस्त्याची समस्या

एमपीसी न्यूज – देहूगावातील माऊली सोसायटीतील रस्त्याची समस्या तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी सोडवल्याने तेथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

माऊली सोसायटीतील रस्ता अतिपावसामुळे खराब झाला होता. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून त्यात पाणी साठल्यामुळे तेथील रहिवाशांना त्यावरून चालणेही अवघड झाले होते. वाहने चालवितानाही मोठी कसरत करावी लागत होती. यामुळे तेथील माझ्या नागरिकांना नियमित त्रासाला सामोरे जावे लागत होते.

त्याबाबत शेळके यांना माहिती मिळताच नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्यावर स्वखर्चाने मुरूम टाकून रस्ता दुरुस्त केला. रस्त्याच्या दूरवस्थेमुळे हैराण झालेल्या रहिवाशांना त्रासमुक्त करू शकलो याचे समाधान वाटते, अशा भावना शेळके यांनी यावेळी व्यक्त केल्या.

HB_POST_END_FTR-A2

.