Dehu : पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या तिघांना बेड्या

एमपीसी न्यूज – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आलेल्या भक्तांच्या गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करणाऱ्या तीन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. तसेच एकावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.

अर्जुन शेषराव शिंदे (वय 18, रा. इंदिरा नगर, ता. पार्थी जि. परभणी), सचिन मच्छिंद्र पवार (वय 18, रा. आष्टा फाटा, ता. आष्टा, जि.अहमदनगर) आणि राजाराम साहेबराव शिंदे (वय 25, रा. सुमित्रा नगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संत तुकाराम महाराज पालखीने देहूगाव येथून प्रस्थान ठेवले. या सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक आणि शेकडो दिंड्या देहूनगरीत दाखल झाल्या आहेत.

भक्तांच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पैसे, दागिने आणि अन्य महत्वाच्या वस्तू चोरणा-या तिघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्यांना बेड्या ठोकल्या. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.