Dehu: देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत आज नवा रूग्ण नाही; एकाचा मृत्यू तर पाच जणांना डिस्चार्ज

Dehu: There are no new patients in Dehuroad cantonment today; One died and five were discharged आज एक 83 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत आजवर 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

0

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज एकही कोरोना रूग्णाची नोंद झाली नाही. मात्र, आज एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. पारशी चाळ येथील 83 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कॅन्टोन्मेंट हद्दीतील आज 5 कोरोनामुक्त रुग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एक 83 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत आजवर 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 384 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी सध्या 52 रुग्ण रुग्णालयात दाखल असून, 133 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 73 लक्षणे विरहित (असम्पिटेमॅटिक) रुग्ण एम जी स्कूल येथील कोरोना सेंटर मध्ये ऍडमिट आहेत.

हद्दीत 115 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस दिला आहे. त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत एकही नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली नसल्याचे म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like