Dehu : श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पार्थ पवार यांच्या हस्ते पूजन

एमपीसी न्यूज- संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे देहु येथील इनामदार वाडा येथे मंगळवारी (दि. 25) महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. इनामदार वाडा येथून मुक्काम हलवून पालखी आकुर्डीकडे मार्गस्थ झाली. यावेळी वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पदमनाभन आदींसह संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.

यावेळी पार्थ पवार म्हणाले, “जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 334 वा पालखी सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्ताने संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन देहू येथील इनामदार वाड्यात केले. महाराष्ट्रात असलेला दुष्काळ जावा. यावर्षी भरपूर पाऊस होऊन माझा बळीराजा सुखावून जाऊ दे.. राज्यात बळीराजाच राज्य येऊ दे असं साकडं यानिमित्ताने त्यांनी विठुरायाच्या चरणी घातलं”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.